गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी पथक सज्ज

बारामती, १९ ऑक्टोबर २०२०: बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गहाळ झालेल्या, हरवलेल्या, चोरीला गेलेल्या मोबाईलचा अत्याधुनिक तंत्राचा वापर करून मोबाईलच्या इएमआय नंबर वरून मोबाइल कोण वापरतो आहे, याचा शोध घेण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी पथक स्थापन केले आहे.

आता बारामती शहरात हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलची तक्रार सिद्धार्थ संजय रायसोनी व अदनान मुख्तार बागवान यांनी बारामती शहर पोलिसांकडे तक्रार केल्यावर शहर पोलिसांच्या विशेष पथकातील पोलीस शिपाई सिद्धेश पाटील व दशरथ इंगोले यांनी मोबाईलची कागदपत्रांवरून त्याचा इएमआय नंबर ट्रक करून दिलीप कोकरे व वीरेंद्र कुमार कायल हे हरवलेले मोबाइल वापरात असल्याचे समजल्यावर त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांना हे मोबाइल रस्त्यावर सापडल्याचे त्यांनी सांगितले.

यापैकी वीरेंद्र कायल यांनी मोबाईल त्याची राजस्थानला असणाऱ्या बहिणीला वापरायला दिला होता. तो मोबाईल परत मागवून आज बारामती शहर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सर्व खात्री करून सिद्धार्थ रायसोनी व अदनान बागवान या तरुणाकडे सुपूर्द केले.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा