श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात आज चुरशीची लढत, विजेता संघ अंतिम फेरीचा दावेदार

पुणे, १४ सप्टेंबर २०२३ : आशिया चषक २०२३ मध्ये आज श्रीलंका- पाकिस्तान सामन्यानंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आणखी एक दावेदार होणार आहे. भारताने आधीच अंतिम फेरीत प्रवेश केलाय तर १७ सप्टेंबरला भारत आणि कोणता संघ आमनेसामने येणार हे आजचा सामना ठरवेल. आशिया कप सुपर ४ सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी प्रत्येकी १ सामना जिंकला आहे. याआधीच्या सामन्यांमध्ये भारताने या दोन्ही संघांना पराभूत केलय.

आजचा सामना उपांत्य फेरीपेक्षा कमी नाही. अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करत आहेत. गेल्या सामन्यानंतर पाकिस्तानने आपल्या संघात मोठे बदल केले. भारत-पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानचे तीन खेळाडू जखमी झाले आहेत. आजची स्पर्धा दोन्ही देशांसाठी चुरशीची होणार आहे.

जर पाऊस पडला तर विजय श्रीलंकेच्या बाजूने असेल कारण त्यांचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. संघांचे १-१ गुण झाले तरी श्रीलंका दुस-या दावेदाराचे विजेतेपद पटकावेल. स्कोअर बोर्डवर श्रीलंकेनेही भारतानंतर दुसरे स्थान पटकावले आहे. श्रीलंकेने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता खेळवला जाईल.

या सामन्यात श्रीलंका-पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हनः
पाकिस्तान: मोहम्मद हरिस, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक ), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह आफ्रिदी आणि जमान खान.

श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेल्लालगे, महिष टीक्षाना, कसून राजिथा, मथिशा पाथिराना.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा