श्रीलंके पाठोपाठ आता बीसीसीआयने जिम्बाब्वे दौरा देखील केला रद्द

मुंबई, दि. १२ जून २०२०: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोविड -१९ साथीच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा ऑगस्टमध्ये होणारा झिम्बाब्वे दौरा रद्द केला. हा निर्णय अपेक्षित होता, कारण श्रीलंका क्रिकेटने गुरुवारी जाहीर केले की जून-जुलै मधील भारताचा मर्यादित षटकांचा दौरा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आला आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ” सर्व देशभर साथीच्या आजाराच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका आणि झिम्बाब्वेचा दौरा करणार नाही, अशी घोषणा शुक्रवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केली.”

शाह म्हणाले, “टीम इंडिया २४ जून २०२० पासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि तितकेच टी -२० सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ दौरा करणार होते, तर २२ ऑगस्ट २०२० मध्ये झिम्बाब्वेमध्ये तीन एकदिवसीय मालिका खेळणार होते.”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा