वीर येथील श्रीनाथ मस्कोबाचा नवरात्र व दसरा उत्सव होणार सध्या पद्धतीने : मंदिरात कोणालाच प्रवेश नाही.

4

पुरंदर दि. ७ ऑक्टोबर २०२०: पुरंदर तालुक्यात असलेले व पुणे व सातारा जिल्ह्यातील लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या वीर येथील श्रीनाथ मास्कोबा देवाचा नवरात्र उत्सव यावर्षी कोरोना संसर्गामुळे मुळे शासनाने घालून दिलेल्या नियमा प्रमाणे अत्यंत साधेपणाने केवळ नित्योपचार करून फक्त पाच लोकांमाध्येच साजरा केला जाईल. त्यामुळे नवरात्र काळात मंदिरामध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.भाविकांनी मंदिरात न येत घरूनच देवा पूजा कारवाई असे आवाहन देवस्थानाचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांनी केले आहे.

 

वीर येथील मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. या काळात विविध पूजा अर्चा असतात. गावातील सुमारे ४०० लोक मंदिरात नऊ दिवस उपवास करीत असतात. या काळात ते मंदिरातच वास्तव्यास असतात. राज्यातील अनेक तमाशा कलावंत या काळात दररोज मंदिरा समोर आपली सेवा बजावत असतात.या काळात अनेक भाविक भक्त देवाच्या दर्शनाला येत असतात.पुजा अर्चना करून येथील विविध कार्यक्रमात सहभागी होत असतात.

दसऱ्यालाही अनेक कार्यक्रम असतात या वर्षीचा सिमोल्ल्घानाचा कार्यक्रम ही रद्द करण्यात आला आहे. पालखी काठ्या व छबिन्याचा कार्यक्रमही या वर्षी होणार नाही. देवाचे नित्योपचार व पूजेसाठी सुद्धा केवळ पाच लोकच सहभागी असणार आहेत. त्यामुळे येथील मानकरी सेवेकरी व भाविकांनी देवसंस्थानाला सहकार्य करावे. मंदिर परिसरात कोणीही गर्दी करू नये असे आवाहन देव संस्थानाच्यावतीने माजी अध्यक्ष रामभाऊ धुमाळ सचिव तय्यद मुलाणी यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा