एस आर पी एफ गट क्र. २ मधील अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे ससूनमध्ये झाले प्लाजमा टेस्टिंग

पुणे, ९ सप्टेंबर २०२०: सध्या पुणे कोरोनाच्या बाबतीत देशातील सर्वात प्रभावित शहर ठरलं आहे. विशेष म्हणजे २ लाखांपेक्षा जास्त संक्रमित रुग्ण असलेला पुणे हा एकमेव जिल्हा ठरला आहे. अश्या परिस्थितीत वैद्यकीय उपाय योजना देखील कमी पडताना दिसत आहेत. समोर उभं असलेलं हे आव्हान पाहता पुण्यातील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २ मधील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपली प्लाजमा टेस्ट करून घेतली आहे. जेणेकरून भविष्यात एखाद्या व्यक्तीला याची गरज भासल्यास त्वरित हे नमुने उपलब्ध करून दिले जावेत.

ही प्लाजमा टेस्ट राज्य राखीव पोलीस बलाच्या गट क्र. २ च्या कार्यालयात करण्यात आली. यावेळी राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २ मधील ७२ पैकी ४९ अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपली प्लाजमा टेस्ट करून घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व डॉक्टरांनी राज्य राखीव पोलीस बलातील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना प्लाजमा थेरेपी बद्दल माहिती दिली.

कोरोना बाबतचे सर्व नियम पाळून व सोशल डिस्टंसिंग ठेवत हे कार्य पार पडले. इतकेच नव्हे तर या आधी देखील राज्य राखीव पोलीस बलातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी प्लाज्मा डोनेशन केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा