एसटीला पावला पांडूरंग, सोलापूर आगाराला ९२ लाखांचे उत्पन्न

सोलापूर, ३ जुलै २०२३ : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता राज्य एस.टी महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. मागील पाचदिवसांत लाखों भाविकांनी एस.टी बसने प्रवास केला. यातून सोलापूर विभागाला ९२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती आगार व्यवस्थापक अजयकुमार पाटील यांनी दिली.

आषाढी एकादशी निमित्त आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून सुमारे १५ लाख वारकरी पंढरपूरात दाखल झाले. यंदा सोलापूर जिल्ह्यांतून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एस.टी महामंडळाकडून राज्यभरातील पाच हजार एस.टी गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते.

सोलापूर आगारासह जिल्ह्यातील नऊ आगाराच्या माध्यमातून २५० एस.टी बसेस वारकऱ्यांच्या सेवेला हजर होत्या. या २५० एस.टी गाड्यांच्या माध्यमातून एक लाख ५७ हजार ९३० एवढे किलोमीटर अंतर पार करत सोलापूर एस.टी महामंडळाने आषाढी वारीच्या कालावधीमध्ये ९२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. एकूणच पंढरीचा विठुराया एस.टी महामंडळाला पावला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा