बलात्कार केल्याच्या आरोपावरून स्टार क्रिकेटपटूला काठमांडू विमानतळावर अटक

32

काठमांडू, ६ ऑक्टोबर २०२२: नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुरुवारी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बलात्काराचा आरोप असलेला संदीप लामिछाने हा गुरुवारी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होताच पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली. आता त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, काठमांडूमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप झाल्यानंतर लामिछाने गेल्या महिन्यापासून चर्चेत आहे. लामिछाने यांनी काही तासांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने लिहिले होते की, मी मोठ्या आशेने आणि ताकदीने पुष्टी करतो की मी या ६ ऑक्टोबर २०२२ रोजी नेपाळला पोहोचत आहे आणि खोट्या आरोपांविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्यासाठी मी नेपाळचा नागरिक असल्याचे घोषित करत आहे. मी निर्दोष आहे आणि न्याय व्यवस्थेवर माझा अढळ विश्वास आहे मी तपासाला पूर्ण सहकार्य करेन.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.