गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय स्टार फुटबॉलर रोनाल्डोच्या नवजात बाळाचं निधन, ट्विटरवर दिली माहिती

स्टार फुटबॉलर रोनाल्डोच्या नवजात बाळाचं निधन, ट्विटरवर दिली माहिती

Cristiano Ronaldo Son Death, 19 एप्रिल 2022: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात बाळाचं निधन झालंय. रोनाल्डोने 18 एप्रिल रोजी रात्री उशिरा (भारतीय वेळेनुसार) ट्विट करून ही माहिती दिलीय. रोनाल्डो आणि त्याची पत्नी जॉर्जिना यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ही घोषणा केली आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या संदेशात लिहिलं आहे की, ‘आमच्या नवजात बाळाचं निधन झाल्याचं अत्यंत दुःखानं कळवावं लागत आहे. हे सर्वात मोठं दुःख कोणत्याही पालकांना सहन करावं लागतं. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि परिचारिकांचे आम्ही आभारी आहोत.

या घटनेमुळं आम्ही पूर्णपणे निराश झालो असून प्रत्येकाने गोपनीयतेची काळजी घेण्याचं आवाहन रोनाल्डोने लिहिलं आहे. आमचं बाळ आमचा देवदूत होता, आम्ही त्याच्यावर कायम प्रेम करू.

क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याची जोडीदार जॉर्जिना यांनी ऑक्टोबरमध्ये घोषणा केली होती की ते जुळ्या मुलांचे पालक होणार आहेत. दोघांनी हॉस्पिटलमधील एक फोटोही शेअर केलाय. या दोन मुलांच्या प्रसूतीवेळी मुलाचा मृत्यू झाला आहे, तर मुलगी सुखरूप आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version