गोल पोस्ट आरोग्य कोविड सेंटर सुरू करा, अन्यथा उपोषण करू – संतोष बागडे यांची माहिती..!

कोविड सेंटर सुरू करा, अन्यथा उपोषण करू – संतोष बागडे यांची माहिती..!

सोरतापवाडी, दि. २३ सप्टेंबर २०२०: कोरोना महामरीमुळे जगभरातील नागरिक मेटाकुटीस आले असताना उरुळी कांचन ता. हवेली येथील निसर्ग उपचार केंद्रात सर्व सोयी सुविधा असल्याने शासनाने तेथे कोविड उपचार केंद्र सुरू करावे.

न चालू केल्यास येणाऱ्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती दिवशी निसर्गउपचार केंद्रासमोर उपोषण करणार असल्याची माहिती संतोष बागडे,यांनी सांगितले आहे.

गरीब नागरिकांपुढे कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न समोर येत आहे. त्यातच घरातील कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास हॉस्पिटलचा खर्च करायचा कसा, असा प्रश्न त्यांनी बोलताना उपस्थित केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version