माढा तालुक्यामध्ये उडीद खरेदी केंद्र सुरु करा – स्वाभिमानी पक्षाची मागणी

माढा, दि. १० सप्टेंबर २०२०ः  तालुक्यामध्ये उडीद खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या वतीने तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे केली आहे.

या वर्षी खरीप हंगामात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे उडीदाचे व मूगाचे चांगले उत्पादन वाढले आहे. परंतु खासगी बाजारपेठेत उडीदाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. म्हणून माढा तालुका स्वाभिमान पक्षाच्या वतीने तहसीलदार राजेश चव्हाण यांना हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करावी अशी जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील व तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

तालुक्यातील कष्टकरी शेतकऱ्यांना कोरोनाच्या भयंकर संकटाच्या काळात काही प्रमाणात का होईना दिलासा मिळावा यासाठी शासनाने हमी भावाने उडीद खरेदी केंद्र सुरू करावे, त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत होईल अशी स्वाभिमानी पक्षाचे म्हणणे आहे.

यावेळी कार्याध्यक्ष आजिनाथ परबत संभाजी पाटील यांच्यासह शेतकरी वर्ग उपस्थित होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी-  प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा