मद्य आणि पानपट्टी दुकाने सुरू करणे ठरू शकते धोकादायक

पुणे, दि. २ मे २०२०: भारतात कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे आणि लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तथापि, या वेळी इतर अनेक गोष्टींमध्ये सवलत देण्यात आली आहे. त्यात मद्य आणि गुटखा दुकानाचाही समावेश आहे. सरकारने हा निर्णय तळीरामांच्या समाधानासाठी घेतला असेल असे नाही कारण त्यातून कर देखील मिळणार आहे. पण याचा गंभीर परिणाम सुद्धा होऊ शकतो हे सुद्धा सरकारने लक्षात घेणे गरजेचे आहे.

ग्रीन झोन असला तरी त्याचा अर्थ असा नाही की कोरोनाचे संकट संपले आणि त्यांना पूर्ण मोकळीक मिळाली. मद्य आणि पान सुपारीच्या सेवनाने आरोग्य तर खालवतेच परंतू ही मंडळी व परिसराची स्वच्छता देखील खालवणारा आहेत. मुख्यतः या विषाणूचा प्रसार तोंडातून बाहेर पडणाऱ्या स्त्रावातून होत आहे. खोकल्याने बारीक थुंकुचे तुषार देखील पुरेसे आहेत हा संसर्ग पसरवण्यासाठी. पण हे शौकीन प्रत्यक्ष पान सुपारी खाऊन थुंकणार आहे.

प्रशासनाने एका बाजूला रस्त्यावर थुंकण्यास गुन्हा जाहीर केला आहे आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी तर लॉक डाउन च्या काळात अनेक जणांना स्वतःची थुंकी साफ करण्याचे सांगत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत तर याउलट सरकारने पान, सुपारी, तंबाखू या चैनीच्या गोष्टी विकण्याची परवानगी देऊन जणू थुंकण्याचीच परवानगी दिली आहे.

मद्य सेवनाने निश्चितच रोगप्रतिकार शक्ती कमी होते. हा संसर्ग देखील त्यांनाच लक्ष बनवत आहे ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. त्यातही एक दोन ठिकाणच्या घटना समोर आल्या आहेत की लोक अक्षरशः तुटून पडत आहे मद्य आणि पान, सुपारी, गुटखा घेण्यासाठी. यात सोशल डिस्टन्सचा चुराडाच होणार आहे. एकूणच काय तर सरकारचा हा निर्णय परिस्थिती बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा