गोल पोस्ट आरोग्य राज्याची २४ तासातील कोरोना आपडेट……

राज्याची २४ तासातील कोरोना आपडेट……

मुंबई, ३० जुलै २०२०: राज्यात सध्याच्या घडीला कोरोना काही प्रमणात का होईना आटोक्यात आले असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र कोरोना रुग्णांच्या बाबतीत वाढ होत आसून बरे होणारे रुग्ण जास्त आहेत. तर राज्याचा रिकव्हरी रेट हा ६० % झाला आहे.

राज्यात गेल्या २४ तासात ९,२११ नवीन रुग्ण आढळले असून २९८ जणांनाचा मृत्यू झाला आहे. सध्या १ लाख ४६ हजार १२९ रुग्णांवर ॲक्टिव्ह उपचार सुरू आहेत.

कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून हे प्रमाण ५९.८४ टक्के एवढे झाले आहे. आज ७,४७८ रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३९ हजार ७५५ झाली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version