राज्यातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

पुणे: महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने सरकारी हॉस्पिटल्समधल्या सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
पुण्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून सर्व हॉस्पिटल्समध्ये युद्ध पातळीवर तयारी करण्यात येत आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. योग्य त्या उपाययोजना सुरू आहेत अशीही माहिती त्यांनी दिली. उपाययोजना करण्यात कुठलीही कसर ठेवू नका, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, पुण्यात ‘कोरोना’चे दोन रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पुणे महापालिकेने युद्ध स्तरावर कामाला सुरुवात केली.
कोरोनाच्या रुग्णांसाठी वेगळ्या हॉस्पिटलची आणि आयसोलेशन वॉर्डसची गरज असल्याने अवघ्या काही तासांमध्ये पालिकेने २०० खाटांची व्यवस्था केली असून लवकरच हे तात्पुरते हॉस्पिटल सुरु होणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा