वैद्यकीय वापरासाठी ८०% ऑक्सीजन राखीव ठेवणे आवश्यक, राज्य सरकारचा निर्णय

पुणे, ८ सप्टेंबर २०२०: ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर आता राज्यसरकार जागं झालं आहे. राज्य सरकारने आता ऑक्सिजन बनवणार्‍या कंपन्यांना वैद्यकीय वापरासाठी ८०% ऑक्सिजन देणं बंधनकारक केलं आहे. यापूर्वी ऑक्सिजन बनवणाऱ्या कंपन्या ४० ते ५० टक्केच ऑक्सिजन मेडिकल वापरासाठी देत होत्या. याबाबत आता काल राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे तसेच ऑक्सिजन वरील दरांबाबत देखील सरकारनं निर्णय घेतला आहे. दिवसाला किती ऑक्सिजन वापरावा यावर सरकारने आता मर्यादा लावल्या आहेत.

ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या कंपन्यांना दर आकारणीबाबत काही मर्यादा ठरवून देण्यात याव्यात अशी मागणी सातत्याने काही रुग्णालयांकडून करण्यात येत होती. तर दुसरीकडे आणखी एक समस्या उभी राहिली आहे ती म्हणजे ऑक्सिजन पुरवठ्याची. ऑक्सीजन पुरवठादारांनी असे म्हटले आहे की, मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने तो रुग्णालयांना पोचवायचा तरी कसा. सध्या आवश्यक असणाऱ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण होत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

एका हॉस्पिटलमध्ये सिलेंडर संपण्यासाठी दहा मिनिटे लागतात. तर हा ऑक्सीजन सिलेंडर भरण्यासाठी पुरवठादारांना तीन तास लागतात. सिलेंडरची ने-आण करण्यासाठी व गाडी भरण्यासाठी दोन ते तीन तास जातात. याव्यतिरिक्त ऑक्सिजन भरून ठेवण्यासाठी सिलेंडर देखील वेळेत उपलब्ध होत नसल्याने या प्रक्रियेत आणखीन विलंब होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा