गोल पोस्ट कट्टा संस्कृती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी आगोदर मिळणार वेतन, कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी आगोदर मिळणार वेतन, कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार

मुंबई, १९ ऑक्टोबर २०२२ : राज्य सरकार कडून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाच्या सेवेमधील कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी २१ ऑक्टोबर २०२२ ला देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.

राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत शासकीय, निमशासकीय त्याच बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर पात्र कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून दिवाळी सणाची मोठी भेट देण्यात आली आहे.

यावर्षी दिवाळी सण २२ तारखेपासून सुरू होत आहे. सरकारकडून त्यापूर्वी म्हणजे २१ तारखेलाच सर्व कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे. यामुळे आता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.

दरम्यान, राज्य शासनाकडून मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, महानगरपालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना राज्य सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रूपये तर आरोग्य सेविकांना एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून देण्यात येणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version