गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई राज्य सरकारकडून खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश

राज्य सरकारकडून खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश

मुंबई, २० मार्च २०२१: सध्या राज्यात कोरोनाचा उद्रेक पुन्हा होताना दिसत आहे. राज्यात दिवसाला पंधरा हजाराच्या वर नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा बंद ठेवल्या होत्या. तसेच नुकतीच कोरोना साठी नवीन नियमावली देखील जारी केली होती तर राज्यातील अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे लॉक डाऊन देखील लावण्यात आले आहे. याबरोबरच आता राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.
सामाजिक अंतर राखणे सोयीस्कर होण्याकरिता उत्पादन क्षेत्रास पाळ्यांमध्ये (शिफ्टमध्ये) वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने घेता येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.
नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थितीदेखील ५० टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे
error: Content is protected !!
Exit mobile version