नवी दिल्ली, २० नोव्हेंबर २०२० : मराठा आरक्षणासंदर्भात अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवरील सुनावणीसाठी तातडीनं घटनापीठ स्थापन करण्यात यावं या करता राज्य शासनानं आज चौथ्यांदा आपला अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला.
राज्य सरकारनं २० सप्टेंबर रोजी अंतरिम आदेश स्थगिती करिता सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता आणि या अर्जावर सुनावणी घेण्यासाठी तातडीनं घटनापीठ स्थापन करण्यात यावं, अशी मागणीही अर्जाद्वारे केली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या ३ सदस्यीय खंडपीठानं ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेश प्रकियेवर परिणाम झाल्यानं राज्य शासनाच्या या अर्जावर घटनापीठासमोर तातडीनं सुनावणी होणं आवश्यक असल्याची विनंती राज्य शासनाचे वरिष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांनी केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी