पुणे महानगरपालिकेत समाविष्ट केलेली गावे वगळण्याचा राज्य सरकारचा डाव, प्रशांत जगतापांचा आरोप

पुणे, २० ऑक्टोबर २०२२ : येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये २०१७ च्या प्रभाग रचनेनुसारच निवडणूक व्हाव्यात असे भाजपाचे म्हणणे आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये नव्याने महानगरपालिकेत सामाविष्ट केलेली ३४ गावे वगळण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, मागील सात महिन्यांपासून पुणे महानगरपालिकेसह राज्यातील २३ महापालिकांवर मागील प्रशासक कारभार पाहत आहेत. कुठलीही महानगरपालिका लोकप्रतिनिधी शिवाय एवढा कळ कारभार करू शकत नाही. असे असताना निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये काही याचिका प्रलंबित आहेत. तरी निवडणुका त्वरित घेण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

याउलट सत्ताधारी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी महापालिका निवडणुका या चार सदस्य प्रभाग रचनेप्रमाणे होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सातत्याने निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लागण्यासाठी त्वरित निवडणुका घेण्यात याव्यात. अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचेही प्रशांत जगताप यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा