मुंबई, ३० ऑगस्ट २०२३: सर्वोच्च व उच्च न्यायालय निकालांच्या मराठी भाषांतरासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकारने न्यायालयांचे निकाल इंग्रजीतून मराठीत भाषांतर करण्यासाठी साॅफ्टवेअर खरेदीसाठी ६ लाख रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आहे.
महाराष्ट्र सरकारने १ ऑगस्ट रोजी मंजूर केलेल्या ठरावानुसार मायक्रोसॉफ्ट फॅमिली साॅफ्टवेअर आणि गुगल ट्रान्सलेटर खरेदी करण्यासाठी ६ लाख ४७ हजार ३२० रुपये निधी मंजूर केला करण्यात आला आहे. मार्च २०२३ मध्ये उच्च न्यायालयाने इंग्रजी निकालांचे मराठीत भाषांतर करण्यासाठी पुढाकार घेतला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सहाय्यक कायदेशीर अनुवाद समितीने त्यासाठी आवश्यक साॅफ्टवेअर उपलब्ध करून देण्याची विनंती राज्य सरकाराला केली होती.
राज्य सरकारने एक ठराव जारी केला असून उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषेसाठी ३०० पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. निवृत्त न्यायिक अधिकारी, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, तसेच विधापिठांनी शिफारस केलेले वकील, कायद्याचे विद्यार्थी, शिक्षक आणि तज्ज्ञ यांच्या समूहातून अनुवादकांना नियुक्त केले जाऊ शकते, असे ठरावात नमुद केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर