लव्ह जिहादच्या घटना थांबवण्याची जबाबदारी राज्य सरकारची- केरळचे एलजी आरिफ मोहम्मद खान

4

पुणे, ५ मे २०२३: ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबाबत सातत्याने वाद वाढत आहेत. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी या चित्रपटाच्या वादाबद्दल म्हटले आहे की, जर राज्यात लव्ह जिहादच्या घटना वाढत असतील तर त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. आरीफ मोहम्मद खान म्हणाले की, मी अद्याप चित्रपट पाहिला नसला तरी शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी याकडे लक्ष द्यावे. केरळमध्ये लव्ह जिहादच्या घटना घडत असतील तर त्याविरोधात पावले उचलण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

गुरुवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट विभागणी करणार असल्याचा आरोप केला होता. काँग्रेस या चित्रपटाच्या विरोधात नाही, मात्र समाजात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी हा चित्रपट जाणीवपूर्वक बनवण्यात आला आहे, अशा परिस्थितीत हा चित्रपट बंद व्हायला हवा, असे ते म्हणाले.

या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट आज म्हणजेच ५ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात कथितरित्या राज्यात महिलांचे शक्तीचे धर्मांतर आणि कट्टरता दाखवण्यात आली. द केरला स्टोरी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच वादाला सुरुवात झाली. या टीझरमध्ये केरळच्या ३२ हजार महिलांची कहाणी दाखवण्यात आली, जे लव्ह जिहादच्या बळी ठरल्या. हा चित्रपट केरळमधील तीन महिलांवर आधारित आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा