रत्नागिरीच्या आणि रायगड जिल्ह्यात चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी राज्यस्तरीय रंगीत तालीम

8

रत्नागिरी, ९ नोव्हेंबर २०२३ : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील आंबोळगड, गणपतीपुळे, वेलदूर, कर्दे आणि वाल्मिकीनगर या ५ गावांमध्ये आज चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी राज्यस्तरीय रंगीत तालीम घेण्यात आली. जेएसडबल्यु, आर जी पीपीएल या २ कंपन्यामध्ये तसेच आंग्रे पोर्ट, फिनोलेक्स, अल्ट्राटेक या बंदरांवर ही रंगीत तालीम झाली. या रंगीत तालमीत राज्य शासनाच्या विविध विभागांनी तसेच आपदा मित्र, भारतीय तटरक्षक, मेरीटाईम, एनडीआरएफ आदी प्रमुख विभागांनीही आपली सज्जता यावेळी दाखविली. या विभागांनी आजच्या रंगीत तालीमेत विविध प्रात्याक्षिके सादर केली.

चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालय स्तरावरबैठक घेऊन विविध विभागांना सूचना देण्यात आल्या होत्या. सकाळी साडेआठ वाजल्यापासून विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी हजर झाले होते. गावांमधून इशारा देवून सतर्क करणे, आवश्यक साधनसामुग्रीच्या सहाय्याने जखमिंना वाचविणे, जखमिंना रुग्णवाहिकेपर्यंत नेणे, रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करणे, समुद्रात असणाऱ्या व्यक्तींना लाईफ बोट, लाईफ जॅकेट, दोरी आदीच्या सहाय्याने वाचवून किनाऱ्यावर आणणे आदी प्रात्याक्षिके विविध विभागांनी आजच्या रंगीत तालीमेत सादर केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, मुक्ता भोसले- पोलीस उपनिरीक्षक, वेदभूषण करागुटकर व विक्रांत तेंडुलकर उपअभियंता बंदर विभाग, सीमा डोंगरे माहिती तंत्रज्ञ, प्रसाद माईन व रमेश तडवी महसूल सहायक आदींनी जिल्हास्तरावरुन या रंगीत तालीमेचे नियंत्रण केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा