गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा बारामतीत होलार समाज संघाची राज्यस्तरीय बैठक संपन्न

बारामतीत होलार समाज संघाची राज्यस्तरीय बैठक संपन्न

बारामती, १४ फेब्रुवरी २०२१: होलार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माणिकराव भंडगे यांच्या अध्यक्षतेखाली बारामती येथील शासकीय गेस्ट हाऊस येथे होलार समाजाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील इतर जिल्ह्यातील होलार समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामतीतील होलार समाजातील गटई कामगार हे उपजीविकेसाठी ऊन, वारा पावसात रस्त्यावर बसून काम करतात यापासून संरक्षण होण्यासाठी गटई स्टॉल मिळण्यासाठी चर्मकार विकास महामंडळा मार्फत समाज प्रयत्न करणार आहे. समाजामध्ये जीवनमान उंचविणे, समाज प्रवाहात येण्यासाठी, शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत असणाऱ्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच समाजातील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, शिकत असलेल्या गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे आश्वासन अध्यक्ष भंडगे यांनी दिले. फलटण तालुक्यातील उपळवे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणी आरोपीस कठोर कारवाई करू तसेच भंडगे यांनी शहरात सुरू असलेल्या समाज मंदिराची पाहणी केली.
यावेळी बळंवत माने, बाळासाहेब देवकाते, दत्ता करडे, भारत देवकाते, बाळासाहेब जाधव, सुधाकर गेजगे, राजाभाऊ माने, संभाजी चौगुले, प्रकाश जावीर, किरण गेजगे, ईश्वर पारसे, गोरख पारसे, नारायण ढोबळे, शांताराम गुळवे, हिरामण माने, अक्षय माने, महादेव जाधव, केंगार, बंडु आहिवळे सुरज देवकाते यासह होलार समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होलार समाज मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर लवकरच बारामतीत होलार समाजाच्या वतीने भव्य दिव्य असा सामुदायिक विवाह सोहळाचे आयोजन करण्यात येणार आहे”माणिकराव भंडगे यांनी सांगितले
न्युज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव
error: Content is protected !!
Exit mobile version