पुणे, २८ फेब्रुवरी २०२१: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याप्रकरणात काही ऑडिओ क्लिप समोर आल्या असून त्यात राठोड यांचा आवाज असल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपकडून सातत्याने सरकारवर हल्ले चढवण्यात येत आहेत. तसेच इतर सामाजिक संघटनांकडून देखील संजय राठोड यांचा विरोध होताना दिसत आहे. अशातच आता पुण्यातील ‘सह्याद्री सम्राट ग्रुप व संस्था’ या संस्थेकडून देखील संजय राठोड यांच्या विरोधात निवेदन देण्यात आले.
पूजा चव्हाण या युवतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्यात यावी याबाबत पुण्यातील ‘सह्याद्री सम्राट ग्रुप व संस्था’ यांच्याकडून वानवडी पोलीस स्टेशन मधील इन्स्पेक्टर कदम यांना निवेदन देण्यात आले. तसेच याप्रकरणी पुणे कमिशनर ऑफीस येथे देखील संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक आकाश उर्फ पप्पू गायकवाड, संदीप खांदवे पाटील
पुणे शहर जिल्हा अध्यक्ष, दत्तात्रय माने
अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, कॅप्टन अरूण कदम ऊपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, आनंद डाडर ऊपाध्यक्ष महाराष्ट्र, अजय भाऊ राखपसरे पुणे शहर ऊपाध्यक्ष, रूद्रा मराठे अध्यक्ष शिरूर तालूका, रीटा नॉर्टन पुणे शहर कार्याध्यक्ष, सविता जाधव पुणे शहर ऊपाध्यक्ष, जया मूकनाक अध्यक्ष वडगाव शेरी मतदार संघ, निकीता काकडे ऊपाध्याक्ष वडगाव शेरी मतदार संघ, रसिका भगवाने कार्याध्यक्ष कोरेगाव पार्क, अनिकेत गागडे अध्यक्ष पुणे शहर, शोभा कांबळे अध्यक्ष चंदन नगर, सुनिता धराडे ऊपाध्यक्ष विश्रांतवाडी, रेश्मा पगडे अध्यक्ष हडपसर, प्रीती आंबेलकर अध्यक्ष फूरसूंगी आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे