पुणे , दि.२४ जुलै२०२० : शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या, परंतू वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अथवा प्रवेश न घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, उदरनिर्वाह भत्ता इत्यादी सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. परंतु सदर योजनेची अंमलबजावणी होताना दिसून येत नसल्याचे आढळून आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०१९ – २० संपले तरी देखील विद्यार्थ्यांना लाभ मिळात नसल्याचे समोर आले आहे. विद्यार्थी मानसिकरित्या खचले गेलेत.योजने अंतर्गत मिळणारा उदरनिर्वाह भत्ता लवकरात लवकर मिळवा ह्या अनुषंगाने आंबेडकराइट स्टुडंट्स ऑर्गनायझेशनने सातत्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न समाजकल्याण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला परंतु मंत्र्यांनी त्याकडे काना डोळा केलेला दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत सरकार मुद्दाम अडथळा निर्माण करत आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे, सदर मागण्या मान्य न झाल्यास #BHIMSQUAD व #ASO पुणे आक्रमक आंदोलन छेडणार असा इशारा संघटने कडून देण्यात आला आहे.
यावेळी BHIMSQUADचे समन्वयक अक्षय तायडे, सक्रिय कार्यकर्ते आशिष साबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे