रिटेल व्यापारी संघाकडून आयुक्तांना निवेदन.

पुणे ,१४ ऑक्टोबर २०२० :जिल्हा रिटेल व्यापारी संघाकडून आज माननीय आयुक्त सुरेश देशमुख ,अन्नधान्य प्रशासन विभाग यांना निवेदन देण्यात आले, सोबतच काही मुद्द्यांवर चर्चाही करण्यात आली. कोरोनाच्या संकटप्रसंगी व्यापारी वर्गाची परिस्थिती अतिशय खालावली आहे मिठाई व किराणा तसेच खाद्यपदार्थ विक्रेते दुकानदारांना अतिशय गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागते.

अशातच काही माथेफिरू विविध संघटनांच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून मालाचा दर्जा कमी आहे व त्याच्यात भेसळ आहे असा दबाव टाकून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे मोठा फटका बसलेला आहे दुकानाचे भाडे कामगारांचा पगार देता येत नाही परिस्थितीचा फायदा घेवून कोणी व्यापारी वर्गाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे अशा व्यक्तींवर संबंधित खात्याने योग्य ती कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे देण्यात आले.

स्थानिक उत्पादन करणारे डिटेल व्यापारी वर्गाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही व व्यापारी वर्गाने उत्तम दर्जाचा माल तयार करून विकावा, साफसफाई ठेवावी, येणा-या दिवाळी सणाला सामान विक्रीसाठी ठेवावे, आणि जर कोणीही चुकीच्या पद्धतीने रिटेल व्यापारी वर्गाला त्रास देत असतील तर अन्नधान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार करावी असे, यावेळी आयुक्त सुरेश देशमुख यांनी सांगितले. त्याचबरोबर सर्व व विभागीय अधिकारी यांचे नाव व फोन नंबर याची यादी संघटनेचा माध्यमातून व्यापारी वर्गाला द्यावी व कायद्यासंदर्भातील मार्गदर्शन करावे यावर चर्चा झाली. कोणाच्या काळात व्यापारी वर्गाचा विचार करून अन्नधान्य प्रशासन विभागाचे परवाने डिसेंबर २०२० पर्यंत ग्राह्य धरले जाणार आहेत तोपर्यंत प्रत्येक व्यापारी व्यापारी वर्गाने नोंदणी व नूतनीकरण वेळ अगोदर करून घ्यावी असेही, त्यांनी सांगितले.

येणाऱ्या दिवाळी सणाला इतर राज्यातील मागवता व्यापारी वर्गाने स्थानिक उत्पादनाला प्राधान्य देऊन उत्तम दर्जाच्या मालाची विक्री करावी असे आव्हान या द्वारे करण्यात आले आहे .  यावेळी आयुक्त सुरेश देशमुख साहेब, उपायुक्त दिलीप संगत साहेब,महाजन साहेब, संघटनेच्या वतीने उपाध्यक्ष विजयजी नरेला, विभागीय अध्यक्ष संतोष राऊत, विभागीय अध्यक्ष संतोष खाडे व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ दि निवंगुणे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा