शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा संदर्भात अभाविप चे कुलगुरूंना निवेदन.

नांदेड, १६ सप्टेंबर २०२०:कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आपले विद्यापीठ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजित करीत आहे. आपल्या विद्यापीठाने सदर परीक्षा वस्तुनिष्ठ (MCQ) प्रश्नांनुसार घेण्याचे जाहीर केले आहे.

सदर पदवी व इतर अभ्यासक्रम परीक्षेत एकूण ४० प्रश्न हे ४० गुणांसाठी असणार आहेत. त्याऐवजी प्रश्नपत्रिकेतील एकूण ५० प्रश्नांपैकी कोणतेही ४० प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायला मुभा द्यावी. सदर प्रश्नांत जे गुण मिळतील त्यांचे रूपांतर ४० गुणांमध्ये करावे. विद्यार्थी हा प्रथमतःच वस्तुनिष्ठ प्रश्नांना सामोरे जात आहे. त्यामुळे त्याचा सराव, अभ्यास कसा करावा तसेच टाळेबंदीमुळे विद्यार्थी गावी गेल्या असल्या कारणाने त्याच्याकडे अभ्यासाच्या साहित्याची कमतरता आहे. म्हणून त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाची Question Bank विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी.

MCQ परीक्षा ही विद्यार्थ्यांना नवीन असल्या कारणाने विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रत्येक विषयाची Mock Test ची सुविधा पुढील ४ दिवसांच्या आत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी.

विद्यार्थ्यांना अंतिम वर्ष परीक्षा कशी द्यायची आहे, ऑनलाइन की ऑफलाइन याबबत विद्यापीठ संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावयचा आहे. परंतु सदर प्रक्रियेत विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. जसे की वेबसाईट लोड घेणे, आयडी व पासवर्ड चुकणे किंवा इतर एरर येणे तरी याबबतच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात व बहुतांश विद्यार्थ्यांना त्यांचा आयडी व पासवर्ड माहित नसल्याने तो महाविद्यालया मार्फत उपलब्ध करून द्यावा.

वस्तुनिष्ठ परीक्षेसाठी ४० प्रश्नांकरिता ६० मिनिटे वेळ देण्यात आला आहे. परंतु सदर ऑनलाइन पद्धत नवीन आहे त्याबाबतच्या समस्या व परिणाम याचा उहापोहवर केलेलाच आहे. म्हणून अभाविप अशी मागणी करत आहे की परीक्षा वेळ वाढवून ९० मिनिटे करण्यात यावा. ऑनलाइन परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रकारच्या शंका आहेत. उदा.लॉगिन कसे करावे, प्रश्न समोर कसे येतील, वेब कॅमेरा कसा सुरु होईल, इत्यादी.

तरी सदर पद्धत विद्यार्थ्यांना समजावी म्हणून त्यासंदर्भात काही डेमो व्हिडिओज वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावेत. तसेच या बाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रकारचे संभ्रम व प्रश्न आहेत. सदर प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांचे फेसबुक, युट्यूब या सारख्या समाज माध्यमांवर लाइव करण्यात यावे व त्यात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा देखील देण्यात यावी अशा मागण्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड यांनी सदर वस्तुनिष्ठ परिक्षांबाबत केलेल्या आहेत.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा