बारामती: नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील शंकर नगर मधील इयत्ता सातवी मध्ये शिकत असणाऱ्या मातंग समाजाच्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर शाळेतीलच शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सामूहिक अत्याचार केला. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास विद्यार्थिनीला जिवे मारण्याची धमकी देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली.
तसेच अकोला जिल्ह्यातील मरोळा येथील मातंग समाजाची अल्पवयीन विद्यार्थिनी मनीषाताई सरकटे हिच्यावर देखील गुंड प्रवृत्तीच्या नराधमांनी बलात्कार करून तिला फास देऊन जिवे मारणाऱ्या या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.अलीकडील काळात महाराष्ट्रात मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.हे रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अन्यथा पुढील काळात समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा संबंधित राज्यभरातील मातंग समाज रस्त्यावर उतरून आपला आक्रोश विविध मार्गाने व्यक्त करून स्वतः स्वतः साठी न्याय मिळण्याच्या दिशेने प्रयत्नशील असेल.वरील प्रकरणातील नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना देण्यात आले.माजी नगरसेवक विजय खरात,सोमनाथ पाटोळे, संजय रणदिवे, अजय खरात,आदित्य खरात,दत्ता खरात,राजु पाटोळे,अक्षय अवघडे,गणेश भिसे,लखन खिलारे,लखन शेंडगे,महेश हेगडे क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.