मुस्लिम समाजाचे मुख्यमंत्र्यांना कारवाईचे निवेदन

बीड, १८ सप्टेंबर २०२०: होळ तालुका केज जिल्हा बीड येथे मुस्लिम समाजातील नागरिकांनवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन मुस्लिम समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

या निवेदन म्हणाले आहे.दिनांक १६ सप्टेंबर रोजी धारूर येथील तबलिग जमातचे अमीर(प्रमुख) काझी निजामुद्दीन व त्यांचे साथीदार अंबाजोगाई येथे एका अंत्यविधी कार्यासाठी जात असताना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील होळ गावाजवळ त्यांच्या चार चाकी गाडी नादुरुस्त झाल्याने त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून थांबले होते. या वेळी काही अज्ञात इसमानी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात काझी निजामुद्दीन व सोहेल तांबोळी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.पुरोगामी महाराष्ट्रात धर्माच्या नावाने हल्ला होणे खुप चिंताजनक बाब आहे. धर्माच्या आधारावर मारहाण करणे म्हणजे एक प्रकारे भारतीय संविधानाच्या मुळावर हल्ला करणेच आहे.

जिल्ह्यात व राज्यात कायदा व व्यवस्था बिघडेल व सामाजिक वातावरण दूषित होईल या अनुषंगाने धर्माच्या नावावर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून UAPA, NSA कायदा व कलम २९४A अंतगर्त गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी.असे निवेदन ए आय एम आय एम जिल्हा अध्यक्ष फैय्याज शेख यांनी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा