गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हाधिकारी यांना शेतकरी पुत्रांचे निवेदन

जिल्हाधिकारी यांना शेतकरी पुत्रांचे निवेदन

बुलढाणा, ०५ नोव्हेंबर २०२०: बुलढाणा जिल्ह्यातील 1419 गावांची सुधारीत पैसेवारी पुनः पंचनामे करून व झालेल्या चुकीची चौकशी करून परत एकदा जाहीर करण्यात यावी, यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पुत्रांकडून जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यंदाच्या पावसाळ्यात परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सदर प्रकरणामध्ये सन २०२० – २०२१ वर्षीच्या खरीप हंगामातील बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यापैकी फक्त 3 च तालुक्यामध्ये “ढगफुटी” झाली का ? उर्वरित 10 तालुक्यांवर अन्याय का ? सुधारीत पैसेवारी मध्ये झालेला घोळ अंतिम पैसेवारी मध्येही झाला तर शेतकरी नुकसान भरपाई पासुन वंचित राहिल.

जिल्ह्यातील एकुन 1419 गावांपैकी फक्त 366 गावांचीच सुधारीत पैसेवारी कमी दाखवण्यात आली व हे सर्व गावे 3च तालुक्यातील आहे जे तालुके आपले खासदार साहेब व पालकमंत्री साहेब यांचे मतदारसंघ आहेत. उर्वरित तालुके यातुन वगळण्यात आले आहे. पावसामुळे सर्वत्र नुकसान झालेले आहे शेतकरी संकटात सापडलेला आहे. बुलढाणा जिल्हा मागासलेला आहे, त्यात कोरोना सारख्या महामारीमुळे सर्वकाही ठप्प झालेलं आहे. शेतकऱ्याला शेतीमध्ये चांगलं उत्पन्नही होत नाही. शेतमालाला चांगला हमी भाव नाही. त्यात सावकाराच्या कर्जाचा विळखा. अशा संकटाच्या काळात प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तलाठी व अधिकारी यांच्यार्फत पुन्हा पंचनामे करून व जाहिर केलल्या चुकीच्या पैसेवारीची सखोल चौकशी करून परत जाहीर करावी व अंतिम पैसेवारी मध्ये या प्रकारचा कसलाही घोळ होणार नाही यांची दक्षता घ्यावी. तसेच, शेतकऱ्याला त्याचा हक्क मिळवून द्यावा. नाहीतर शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सामोरे जाल अशी चेतावणी देखील यावेळी देण्यात आली.

यावेळी मयूर गिते, चैतन्य जोशी, कैवल्य कुलकर्णी, मकरंद जोशी, स्वप्निल कुलकर्णी, राहुल नागपूरे, अभिजीत हुडेकर, कौशल रींढे, कपिल झगडे आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रगती कराड

error: Content is protected !!
Exit mobile version