माढा, १९ डिसेंबर २०२०: माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या वतीने मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांना रेल्वे संबंधीच्या विविध मागण्यांचे लेखी पत्र देण्यात आले. कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनला दिलेल्या भेटीनंतर कुर्डुवाडी स्थानकात उभ्या केलेल्या शानदार शामियान्यात खासदार व नागरिकांच्या वतीने मित्तल यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर रेल्वे सुरक्षा बल प्रशिक्षण केंद्राच्या १२० एकर जमिनीवर रेल्वे प्रवासी वाहतूक डबे दुरुस्ती कारखाना बंद झालेल्या रेल्वे हायस्कूलच्या ठिकाणी सीबीएससी पॅटर्नचे केंद्रीय विद्यालय, कुर्डुवाडी शहरातील गेट नं ३८ येथे सब-वे ऐवजी उड्डाणपूल करणे, मुंबई-विजापूर-मुंबई आठवड्यातील सर्व सातही दिवस धावावी, मुंबई-विशाखा पट्ट्णम् या गाडीस कुर्डुवाडी येथे थांबा मिळावा कुर्डुवाडी येथील रेल्वे ड्रायव्हर व गार्ड यांची लाॅबी कार्यालय कुर्डुवाडीतच कायम रहावे. आदी मागण्यांचा समावेश देण्यात आलेल्या लेखी पत्रात करण्यात आला आहे.
यावेळी मोडनिंबसह करमाळा तालुक्यातील केम जेऊर भोगेवाडी वडशिवणे गावातील ग्रामस्थ कुंकू व्यापारी व विविध सामाजिक संघटना आदींच्या वतीने खासदार मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, भाजपचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, करमाळा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, सोलापूर मंडल रेल्वे प्रबंधक शैलेश गुप्ता, कुर्डुवाडी रेल्वे कारखान्याचे उपमुख्य यांत्रिकी अभियंता संजय साळवे, दत्ता जाधव, योगेश पाटील, जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार, विजयसिंह परबत, उमेश पाटील, अमोल कुलकर्णी, योगेश पाटील, सुधीर गाडेकर, करण भगत, कारखाना प्रबंधक संजय साळवे, स्टेशन प्रबंधक आर डी चौधरी, सहा स्टेशन मास्टर सुभाष पाडुळे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील