बारामती होलार समाज संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन.

बारामती २५ जानेवारी २०२१: फलटण तालुक्यातील उपळवे गावातील अल्पवयीन मुलीच्या हत्याप्रकरणाची फेर चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी तसेच या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी.यासाठी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना होलार समाज संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

फलटण तालुक्यातील उपळवे येथील बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या केली नसुन हत्या केली असल्याचा संशय अल्पवयीन मुलीच्या आईने केला आहे.याप्रकरणी फलटण तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या आईने ५ ऑक्टोबरला मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती.

८ ऑक्टोबरला अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावाजवळील विहिरीत सापडला.तर मृतदेहाची अवस्था संशयास्पद होती, तर मुलीच्या कमरेला दगड बांधले होते.स्थानिक पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला मात्र मुलीच्या कुरुंबियांनी ही हत्या असून या प्रकरणाची कसून चौकशी करून आरोपीला कडक शिक्षा करावी
यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना होलार समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी बळवंत माने, बाळासाहेब देवकाते, बाळासाहेब जाधव, भारत देवकाते, राजाभाऊ माने, छगन गोरे, सुरज देवकाते उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा