माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रयत क्रांती संघटना माढा तालुक्याच्यावतीने निवेदन – अमर पवार

माढा २० ऑक्टोबर २०२० :अतिवृष्टीने व पुराच्या पाण्याने उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांना जिरायत भागातील शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार व बागायत व फळबाग शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १ लाख रूपये प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी.चालू वर्षाचे पिककर्ज माफ करावे. या व इतर मागण्याचे निवेदन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रयत क्रांती संघटनेचे माढा तालुका प्रसिद्धी प्रमुख अमर पवार यांनी दिले. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माढा,करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी गारअकोले,टाकळी (टें),चांदज या ठिकाणी त्यांनी दौरा केला,यावेळी निवेदन देण्यात आले.

निवेदनात पुढे म्हटले आहे की,आपण आपल्या कार्यकाळात वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत केली होती.सध्या कोरोनाने व अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यांची उभी पिके पाण्याखाली गेल्याने पिके,जनावरे,घरे यांची नुकसान व हानी झाली आहे.शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.त्यांना जिरायत भागातील शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार व बागायत व फळबाग शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १ लाख रूपये प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी. चालू वर्षाचे पिककर्ज माफ करावे व थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.(थकित कर्ज माफ करावे). कृषी पंपाचे विज बिल संपुर्ण माफ करावे. या मागण्या निवेदन देऊन करण्यात आल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा