कृषी विधेयकास विरोध करत शेकाप पक्षातर्फे जिल्हाधिका-यांना निवेदन.

17

पुणे,२३ सप्टेंबर २०२० :शेतकरी कामगार पक्षाचे कोषाध्यक्ष राहुल पोकळे यांनी पुणे जिल्ह्याच्यावतीने जिल्ह्याधिकारी राजेश देशमुख यांना दोन निवेदने दिली. ‘भाजप प्रणीत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकास विरोध व महाराष्ट्र सरकारने सदर विधेयकाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी’,अशी मागणी राहुल पोकळे यांनी या निवेदनातून केली आहे. सत्ताधारी भाजप सरकारने केंद्रामध्ये शेती आणि शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे कृषि विधेयक संसदेमध्ये मंजूर करून अन्याय केलेला आहे.

त्यासोबतच महाराष्ट्राचे वीजेचे दर ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाणे आणि वीजेचे संकट हे राज्य सरकारनी एनरॉन प्रकल्प चुकीच्या अटी-शर्ती सह स्वीकारल्यानंतरच प्रामुख्याने हे सुरू झाले आहे असे सांगत , ग्राहकांच्या हक्कांसाठी वीज उत्पादक व वितरक असणाऱ्या शासकीय व खाजगी कंपन्यांच्या जनरल ऑडिट आणि कॅग ऑडिटची मागणी करत त्याचे आदेश विनाविलंब तात्काळ जारी व्हावेत. तसेच कोरोनाच्या काळात आपत्तीच्या काळखंडातील ० ते ३०० युनिट्स वापरापर्यंतची रहिवासी व छोट्या व्यावसायिकांची वापराची वीजबिले तात्काळ माफ केली जावी.

अश्या मागण्या करत राहुल पोकळे यांनी जिल्ह्याधिका-यांना निवेदन दिले. त्यावेळी सोबत पुणे शहर अध्यक्ष सागर आल्हाट , नयन पुजारी , अमोल मानकर , संजय गवळी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.