गोल पोस्ट गुन्हा सावत्र बापाचा नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार 

सावत्र बापाचा नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार 

बारामती, ९ ऑक्टोबर २०२०: नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाने बलात्कार केल्याची धक्कादायक व संतापजनक घटना बारामती तालुक्यातील मोरगाव जवळील शेराचीवाडी येथे घडली. याप्रकरणी तक्रार दाखल होताच वडगाव निंबाळकर पोलिसांनी अवघ्या काही मिनिटात सावत्र बापाला अटक केली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थ संतापले असून या नराधम बापाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.

याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरुध्द बलात्कारासह बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण, अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी शेराचीवस्ती येथे हा प्रकार घडला. पीडित मुलीची आई जेजुरी येथे राहते. आरोपी हा मूळचा बोकनगाव (ता. जि. लातूर) येथील असून सध्या तो मोरगावात राहतो. हे कुटुंब शेराचीवस्ती येथे भाडोत्री खोलीत राहण्यास आहे. पिडीत मुलीच्या आईशी आरोपीने दुसरे लग्न केले आहे. घटनेच्या दिवशी आरोपीने पिडीत अल्पवयीन मुलीच्या अंगावरील कपडे काढत तोंड दाबत तिच्यावर पाशवी बलात्कार केला. तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुभाष मुंढे,  हवालदार संजय मोहिते यांनी लागलीच नराधम सावत्र बापाला अटक केली.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version