गोल पोस्ट महाराष्ट्र शुल्लक कारणावरून मुलाने केली सावत्र आईची हत्या, जळगाव मधील धक्कादायक घटना

शुल्लक कारणावरून मुलाने केली सावत्र आईची हत्या, जळगाव मधील धक्कादायक घटना

जळगाव, २७ सप्टेंबर २०२२ : जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यामध्ये गलंगी येथे शुल्लक भांडणातून एका मुलाने आपल्या सावत्र आईचा खून केल्याची घटना घडली आहे. मुलाने आपल्या सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा घालून हत्या केली आहे. गलंगी येथील खळ्यात राहत असलेल्या आदिवासी कुटुंबात मुलाचे आणि वडीलांचे भांडण झाले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सावत्र आईने मुलाला तिथून निघून जायला सांगितले. याच रागातून मुलाने आपल्या सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा घालून खून केल्याची घटना घडली आहे

या घटनेत मिळालेल्या माहिती प्रमाणे, जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा तालुक्यात गलंगी येथे हे आदिवासी कुटूंब राहत आहे. वडीलांचे आणि मुलाचे भांडण सुरू असताना सावत्र आईने त्याला तिथून निघून जायला सांगितले यामुळे रागाला जाऊन सावत्र मुलगा दीपक उर्फ मगन पावरा २८ वर्षे याने सावत्र आईच्या डोक्यामध्ये लाकडी दांडा घालून खून केला. दरम्यान सावत्र आई खाटेवर झोपेत असताना दीपक याने लाकडी दांडके मारून आईला गंभीर दुखापत केली. यानंतर काही वेळाने सावत्र आई सहाबाई यांचा मृत्यू झाला. सावत्र मुलाविरोधात पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर चोपडा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन झालेल्या प्रकरणाची माहिती घेतली. मृत महिलेचा संशयीत मुलगा दीपक याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version