नवी दिल्ली, १० ऑक्टोबर २०२० : आज जागतिक स्थलांतरित पक्षी दिन आहे. यानिमित्तानं भारतानं स्थलांतरित पक्षांच्या जतन आणि संवर्धनासाठी राष्ट्रीय कृतीआराखडा जाहीर केला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली आहे.
स्थलांतरित पक्ष्यांचं संरक्षण आणि जतन करणं हे देशातील आर्द्र प्रदेश, पाणथळ क्षेत्र तसेच पक्ष्यांचे प्रदेशानुसार निर्माण झालेले प्राकृतिक अधिवास जपण्यासाठी उपयुक्त असून त्यामुळे स्वाभाविकपणे नैसर्गिक संरचना आणि पर्यावरणीय प्रणाली यांचंही संरक्षण होतं.
याचा लाभ निसर्गातील इतर बाबींच्या संवर्धनासाठी होणार असल्याचं जावडेकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी