परभणी, दि. २४ मे २०२०: परभणी शहरातील नानलपेठ भागात राहाणारे गिरीष शंकरलाल माटरा हा साई प्रोडक्टस वलाद गांधी नगर या कंपनीच्या नावाने बनावट खवा विक्री करत होता. हा खवा जामखेड येथील साथीदारांच्या मदतीने जामखेड येथे तयार केला जात होता. संबंधित गुन्हेगार हा बनावट खवा विक्रीसाठी परभणी येथे घेवुन येवुन परभणी, बीड व हिंगोली जिल्ह्यात विक्री करत होता.
स्थानिक गुन्हे शाखेस मिळालेल्या माहिती नुसार पथकाने दि. २२/०५/२०२० रोजी पोलीस ठाणे नानलपेठ भागातून एमएच १६ सीसी ५८२१ क्रमांकाच्या पिकअप वाहनासह १) गिरिष शंकरलाल माटरा रा. परभणी, २) सय्यद असलम हसन रा. जामखेड, ३) सलमान चाँद शेख रा. जामखेड, ४)
करण महेन्द्र शिंदे व्यवसाय वाहन चालक रा. जामखेड, ५) सयद अहमद हसन रा. जाखखेड यांना ताब्यात घेतले.
सदर तपासात आरोपीतांनी जामखेड येथे सय्यद असलम हस याच्या घरी बेकायदेशीररित्या खवा तयार
करुन साई प्रोडक्टस, वलाद गांधीनगर या कंपनीच्या नावाची पाकीटे गुजरातमधुन मागवून घेवून हा खवा आयएसओ प्रमाणित असल्याचे दाखवून मागील सहा महिन्यापासुन मिठाई तयार करणा-या उत्पादकांना त्याची विक्री करत होता. आपसात कट रचून त्यांच्याकडे खवा अथवा दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याचा कोणत्याही प्रकारचा परवाना, शैक्षणीक व तांत्रीक गुणवत्ता, कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसतांनाही स्थानिक व्यापा-यांची फसवणुक केलेली आहे.
तसेच सदर खवा, दुग्धजन्य पदार्थ हा वाताणुकूलीत वाहनातुन वाहतुक करावयास पाहिजे असे असतांनाही प्रखर उन्हाळयात जामखेड येथून परभणी येथे उन्हाच्या सरळ संपर्कात त्याची वाहतुक करून मानवी जीवीतास विषबाधा अथवा अपाय होईल अशा रितीने वाहतुक केली आहे. तसेच मागील सहा महिन्यांपासून बेकायदेशीर
अपायकारक उत्पादनाची विक्री करुन पाकिटावर दिलेल्या सुचनांचा भंग केलेला आहे.
एकुण ३ लाख ८४ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त
सदर कारवाईत पिकअप वाहन क्रमांक एमएच १६ सीसी ५८२१ किमती २.५०,०००/- रुपये तसेच बेकायदेशिर उत्पादन केलेले २८ गोण्यातील एकुण ८४ सिलबंद खव्याची पाकीटे ( पाकिटावर बॅच नंबर आणि उत्पादनाची तारीख नमुद नसेलेले ) एकुण वजनी ८४० किलो किमती १,३४,४००/- रुपये असा एकुण ३ लाख ८४ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन सदर प्रकरणी आरोपी विरूध्द पोलीस ठाणे नानलपेठ गु.रं.न ३१७/२०२० कलम ४१७, ४२०,३२८. १८८, २७९, २७०, २७३, ४८६, ४८२, ४८५, ४८८ भा.दं.वि
प्रमाणे सपोनि दिनेश मुळे स्था.गु.शा यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी