शेअर बाजाराची सुरुवात तेजीत, मझगांव डॉक शिपबिल्डर्स आयपीओ’ची दमदार सुरुवात

मुंबई, १२ ऑक्टोंबर २०२०: आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मकतेमुळं आज भारतीय शेअर बाजारात तेजीत सुरवात झाली. यासह काही दिवसांपूर्वीच मझगांव डॉक शिपबिल्डर्सचा आयपीओ निघाला होता हा आयपीओ देखील प्रीमियम’नं ओपन झाला आहे. मझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीचा आयपीओ ४९% प्रीमियम किमतीवर लिस्ट झाला आहे. मात्र यूटीआय असेट मॅनेजमेंट कंपनीची लिस्टिंग फारशी कमाल दाखवू शकली नाही.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २०७ अंकांच्या वाढीसह ४०,७१६ वर उघडला. त्याचप्रमाणं नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ५९ अंकांच्या वाढीसह ११,९९३ वर उघडला. सकाळी दहा वाजता सेन्सेक्स २७१ अंकांनी वाढून ४०,७८० वर पोहोचला.

या शेअर्समध्ये वाढ

सुरुवातीच्या व्यापारात, सुमारे ८०९ शेअर्समध्ये वाढ झाली आहे आणि ३२६ मध्ये घट झाली आहे. मेटल, बँक, इन्फ्रा आणि एएफएमसी शेअर्स मध्ये तेजी दिसून येत आहे. बीएसईतील प्रमुख समभागांमध्ये आयटीसी, पॉवरग्रीड, एसबीआय, इन्फोसिस, कोटक बँक इत्यादींचा समावेश होता, किमती कोसळलेल्या शेअर्समध्ये अ‍ॅक्सिस बँक, मारुती, एचडीएफसी बँक, टायटन इत्यादींचा समावेश होता.

मझगांव डॉक शिपबिल्डर्स ची जबरदस्त लिस्टिंग

भारतातील सुरक्षा उपकरणं बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक दिग्गज कंपनी मझगांव डॉक शिपबिल्डर्स, जी भारतीय नौदलासाठी जहाजे व सबमरीन बनवण्याचं काम करते तिचा आयपीओ ४९% किमतीच्या वाढीसह प्रीमियमनी लिस्टिंग झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई चा इंडेक्स वर हा आयपीओ २१६.२५ तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एन एस सी वर २१४.९५ रुपयांनी लिस्ट झाला आहे. या आयपीओची ईशू किंमत १४५ रुपये होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा