दिल्लीत ओवेसींच्या घरावर दगडफेक; AIMIM प्रमुखांकडून तक्रार दाखल

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी २०२३ : एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घरावर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आली आहे. याबाबत स्वतः ओवेसी यांनी ट्वीट करत माहिती दिली. रविवारी सांयकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

असदुद्दीन ओवेसी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझ्या दिल्लीतील घरावर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला आहे. २०१४ पासून ही चौथी घटना असून, या दगडफेकीत खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली आणि घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिल्ली पोलिसांनी दिली.

दरम्यान, ओवेसी राजस्थानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते, तेथून त्यांनी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराची सुरुवात केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा