अंबड, जालना २१ जून २०२४ : जालन्यातल्या अंबड तालुक्यातील शिवाजीनगर येथे काही अज्ञातांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक केलीय. बस चालक आणि वाहक यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय.
बस क्रं. Mh 20 BL 1116 छत्रपती संभाजीनगरहून बीड कडे निघाली होती. त्यादरम्यान धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजीनगर येथे काही अज्ञातांनी बस वर दगडफेक केलीय. यात बसची समोरची काच फुटलीय. दरम्यान अचानक हा प्रकार घडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून बस चालक आणि वाहक यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी