वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, मध्यप्रदेशात भोपाळ मधील घटना

भोपाळ, ११ जून २०२३ : भारतीय बनावटीची सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस अल्पवधीतच लोकप्रिय झाली. यामुळे अनेक मार्गांवरुन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्रातून मुंबई- गांधीनगर, मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. त्याचबरोबर मुंबई शिर्डी अशीही ट्रेन सुरु आहे. आता लवकरच मुंबई- गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. देशभरात आतापर्यंत १५ पेक्षा जास्त वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहे. परंतु या गाडीवर दगडफेकीच्या घटना वारंवार घडत आहे. अशीच घटना मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घडली आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाली आहे. अज्ञात लोकांकडून ही दगडफेक करण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसवर आठवडाभरापासून दगडफेकीचे प्रकार होत आहे. परंतु स्थानिक रेल्वे प्रशासनाकडून यासंदर्भात माहिती दिली जात नव्हती. आता दगडफेकीचे प्रकार वाढल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. या दगडफेकीत पाच डब्यांचे नुकसान झाले आहे. ३० खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. आता रेल्वेकडून या खिडक्यांच्या दुरुस्तीचे काम हातात घेण्यात आले आहे.

आरपीएफ आणि जीआरपीकडून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला राहणाऱ्या मुलांकडून ही दगडफेक झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक प्रकरणांमध्ये रेल्वे ट्रॅकच्या शेजारी राहणाऱ्या लोकांकडूनच दगडफेक झाल्याचे स्पष्ट झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा