कुर्डूवाडीतील भुयारी गटाराचे निकृष्ट काम थांबवा

माढा, दि.१५ सप्टेंबर २०२० : माढा तालुक्यातील कुर्डूवाडी नगरपरिषदेने सुरू केलेले भुयारी गटाराचे निकृष्ट काम होत असून ते थांबवावे अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रांत अधिकारी ज्योती कदम यांना दिले आहे.

शहरातील भुयारी गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून सदरचे काम उत्तम दर्जाचे करावे, अन्यथा मनसे स्टाईलने काम बंद आंदोलन केले जाईल व ते थांबवले जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रांताधिकारी ज्योती कदम व मुख्याधिकारी चरण कोले यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

सदरचे काम हे कंत्राटदार आर्थिक फायद्यासाठी निकृष्ट करत असून यामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होत आहे. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सागर बंदपट्टे व उपाध्यक्ष गणेश चौधरी, शहर संघटक आकाश लांडे,सरचिटणीस सोमनाथ पवार व अशोक घोडके व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा