कोरोना लसीची भारतात साठवण करणे आव्हानात्मक, -७० अंश तापमान आवश्यक

नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर २०२०: कोरोना दिवसेंदिवस भारतात पसरत चालला आहे. दरम्यान, लसीचा साठा हा चर्चेचा विषय बनला आहे. तसंच लस वितरणावर धोरण आखण्याची गरज असल्याचंही सांगितले जात आहे. पण असं एक कारण पुढं आलं आहे ज्यामुळं भारतात लस साठवणे हे एक मोठं आव्हान असणार आहे.

खरं तर, नुकतीच अमेरिकेतील फार्मा कंपनी फायझरनं घोषित केलं की त्यांची लस चाचण्यांमध्ये ९०% पेक्षा जास्त प्रभावी आहे. दरम्यान, भविष्यात, आरोग्य मंत्रालयानं भारतात लस उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले, परंतु लसीच्या साठवणीवरील पेच उभा राहिला आहे. अशा लस साठवण्यासाठी उणे ७० अंश सेल्सिअसची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

दिल्लीस्थित एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी बुधवारी सांगितलं की लस साठवणुकीसाठी किमान तापमान उणे ७० अंश सेल्सिअस असणं हे भारतातील एक मोठं आव्हान आहे. विशेषत: लहान शहरं आणि ग्रामीण भागात अशा थंड सुविधा राखणं फार कठीण आहे.

तथापि, अहवालानुसार कोल्ड चैन’ची तयारी सुरू केली आहे, जेणेकरुन देशातील सर्व नागरिकांना लस मिळू शकंल. बहुतेक लसी कंपन्यांना शीतगृहाची गरज भासणार असल्यानं त्या काळात हे उपयोगी ठरणार आहे. अमेरिकन कंपनी फायझर आणि जर्मन कंपनी बायोटेक या लसीवर एकत्र काम करत आहेत. कंपनीचा दावा आहे की, त्यांची लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान हा दावा करण्यात आला आहे.

अलीकडंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही फायझर लसीची उपलब्धता आणि साठवण यावर सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. त्यांनी प्रत्येक भारतीयांना लस उपलब्ध करून देण्याच्या धोरणासंदर्भात सरकारला प्रश्न विचारला आहे. त्यांच्या मते, लस साठवण आणि वाहतुकीसाठी वजा ७० डिग्री तापमान आवश्यक असंल आणि ही सुविधा भारतातील कोणत्याही लॉजिस्टिक कंपनीकडं नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा