पुणे, १८ ऑक्टोबर २०२२ : कोहिनूर या शब्दातच हिऱ्याची ताकद जडली आहे, असं म्हणतात. ते खरं ही आहे. सध्या हा हिरा ब्रिटनच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ यांच्या मुकूटात जडवलेला आहे. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर हा हिरा परंपरेप्रमाणे राणी कॅमिला यांच्याकड सुपूर्त केला जाणार आहे. हा राज्याभिषेक ६ मे २०२३ रोजी होणार आहे. त्यानुसार हा हिरा आता महाराणी कॅमेला यांना मिळेल.
वास्तविक कोहिनूर हिरा भारताची मालमत्ता असून आता एलिझाबेथ राणीच्या मृत्यूनंतर हा हिरा भारत परत मागण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे हा हिरा परत मागितल्यास भारत आणि ब्रिटन दोन देशात वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
त्यामुळे राणीला हा हिरा परिधान न करण्यासाठी बकिंगहॅम पॅलेसतर्फे विनवणी करण्यात येत आहे. ही विनवणी राणी किती मान्य करेल, हे मात्र आताच सांगता येत नाही. मात्र जी भारताची संपत्ती आहे, ती संपत्ती परत मिळवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे, हे मात्र तितकचं खरं.
त्यामुळे आगामी राज्याभिषेकात कोहिनूर हिरा दिसेल की नाही? हे मात्र काळच ठरवेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस