चांदवड घाटात तीन ट्रकचा विचित्र अपघात

नाशिक, दि.११मे २०२०: नाशिक परिसरातून उत्तर प्रदेशाकडे जाणाऱ्या ट्रकचा चांदवड घाटात विचित्र अपघात झाल्याची माहिती समोर आली. संचारबंदी काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर राज्यातील परप्रांतीय नागरिकांना जाण्यासाठी मुभा मिळाल्याने हे नागरिक मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी जात आहे.

मुंबईहून शेकडो ट्रकने हे नागरिक आपल्या घरी निघाले आहे. अशातच चांदवडच्या राहुड घाटात ३ ट्रकचा आणि एका कारचा विचित्र अपघात झाला आहे. परप्रांतीयांच्या ट्रकला झालेल्या या अपघातात कारमधील ३ जण गंभीर आहेत तर इतर अनेकजण जखमी झाले आहे.

जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, या विचित्र अपघातामुळे मोठी वाहतुक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.सकाळच्या वेळी अपघात झाल्याने यात अनेक लोक अडकून पडले होते. दरम्यान मदतकार्य करण्यास उशीर झाला होता.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा