बिजनौर, २० फेब्रुवरी २०२१: उत्तर प्रदेशाच्या बिजनौर जिल्हातील एका ग्रामपंचायतीने १६ वर्षाच्या मुलाला आपल्या ८ वर्षीय चुलत भावाचे यौन शोषण केले म्हणून १ लाख रूपये दंड आणि ४ कानाखाली लगावल्या आणि प्रकरण मिटवले. यामुळे पीडित कुटुंबीयांनी पोलीस स्थानकात घटनेची नोंद केली नाही. घटनेनंतर पिडित मुलाला रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
गावातील लोकांच्या मते, १६ वर्षीय मुलाने पीडित मुलाला लालच देत शेतात बोलावले आणि तिथे त्याचे यौन उत्पीडन केले. जेव्हा लोकांनी पिडित मुलाचा रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा तिथे जाऊन त्याला वाचवले.
त्यानंतर त्याला नूरपुर कस्ब्यातील जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्या नंतर बुधवारी गावात पंचायत बोलवण्यात आली. आरोपी ला लगेच शिक्षा सुनावत चार कानाखाली आणि १ लाख दंड देण्याचा आदेश देण्यात आले.
एसएचओ जय कुमार यांनी सांगितले की, “हे एकाच कुटुंबातील प्रकरण आहे. आम्ही गावात जाऊन पिडित कुटुंबाला भेट देऊन सांगितले. पण, त्यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला. आम्हाला पंचायतीच्या निर्णयाबाबत माहिती नाही. आणि असे निर्णय कायद्यात बसत नाही. “असे ते म्हणाले. तसेच एका वरिष्ठ पुलिस अधिकारीच्या संपर्क करण्याने त्यांनी या घटनेवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव