अजब कारभार, भक्तांनी चक्क कोट्यवधी रुपयांच्या नोटांनी मंदीरात केली सजावट

आंध्रप्रदेश, ८ ऑक्टोबर२०२२: विशाखापट्नम येथील एका मंदिरात नवरात्रीनिमित्त कोट्यावधी रुपयांची चलनी नोटा आणि सोन्याची सजावट करण्यात आली होती. वासवी कन्यका परमेश्वरी मंदिराचा प्रबंधन समितीने मंदिराच्या भिंती आणि फरशीवर एकूण आठ कोटी रुपयांची सजावट केली होती.

एक रुपयापासून दोन हजार रुपयांपर्यंतच्या नोटांचे बंडल देवीच्या चारही बाजूने तसेच छतावरही या नोटांचे बंडल लावले होते. हे मंदिर १३५ वर्ष जुने आहे. मंदिरांचे विश्वसनीय पदाधिकाऱ्यांनी असे सांगितले की, हे दागिने आणि नोटा एका भक्ताने दिल्या होत्या. उत्सवानंतर ते संबंधित भक्ताला परत दिले जाणार आहेत.

या देवीची आंध्रप्रदेश मध्ये अनेक ठिकाणी मंदिरे आहेत आणि भक्तजण आहे. गेल्यावर्षी नेल्लोर जिल्ह्यातील वासवी कन्यका परमेश्वरी मंदिराला ५.१६ कोटी रुपयांच्या चलणी नोटांनी सजवण्यात आले होते. तीथे देखील एका भक्ताने ही रक्कम दिली होती.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा