भारतात भटक्या कुत्र्यांना मान आहे, पण मुस्लिमांना नाही : असदुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर २०२२: गुजरातमध्ये दांडिया कार्यक्रमादरम्यान मुस्लिम तरुणांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यावर घटनेवर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मत व्यक्त करताना गुजरात राज्य सरकार आणि भाजपवरही जोरदार टीका करत निशाणा साधला.

ते म्हणाले, देशात ज्या ठिकाणी भाजपचे सरकार आहे, त्या ठिकाणी मुस्लीम लोक खुल्या तुरुंगात कैद्याप्रमाणे जिणं जगत आहेत. पुढे ते म्हणाले की, भारतात भटक्या कुत्र्यांना किंमत आहे, मान सन्मान आहे मात्र देशातील मुस्लिमांना किंमत नसल्याची खदखद त्यांनी व्यक्त करुन दाखवली आहे.

देशात मुस्लिमांपेक्षा रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना मान दिला जातो मात्र मुस्लिमांना दुजेभावाची वागणूक दिली जाते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी का बोलत नाहीत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. एकीकडे हे प्रकार सुरु असतात तर दुसरीकडे धार्मिक मुद्यावरुन मदरसेही पाडले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा