राजगृहावर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी

6

बारामती, दि. १० जुलै २०२०: राज्यात मागील काही दिवसांपासून मुंबई येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानावर अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड केल्याने राज्यात अनेक ठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त करत हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

बारामती शहरातील अखिल विद्यार्थी परिषदेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या राजगृह निवास स्थान हे सर्व भारतीयांच्यासाठी पवित्र आणि प्रेरणास्थान आहे. या पवित्र वास्तूवर दि.७ रोजी मुंबई, दादर येथे काही अज्ञात हल्लखोरांनी तोडफोड केली. हे कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. या कृत्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जाहीर निषेध करून दोषींवर कठोर कारवाई अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बारामती शाखेच्या वतीने आज उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी अभाविप जिल्हा संयोजक समीर मारकड, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य वैभव सोलनकर, प्रसाद भोसले, बाळासाहेब सोलनकर, जिल्हा आयाम प्रमुख अक्षय नाळे, सुजित सोरटे, तन्मय शिरसागर,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी चे सदस्य वैभव सोलनकर म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आपले प्रेरणा स्थान आहे. त्यांच्या घरावर भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा