पंढरपूर, २८ सप्टेंबर २०२२: पंढरपूर विकास आराखड्याच्या विरोधात आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकांने बंद ठेवली आहेत. यामुळे परिसरात शुकशुकाट आहे. पंढरपुर हे महाराष्ट्रातील एक मोठे तीर्थस्थळ आसल्याने रोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.
पंढरपूरात तीर्थ क्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या विकास आराखाड्यात मंदिर परिसरातील रस्ते रुंद करण्यात येणार असल्याने याला मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी विरोध घेतला आहे. या बाबत व्यापाऱ्यांनी सरकारला देखील सुचंना दिली आहे.
दरम्यान महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी एक दिवस दुकांन कडकडीत बंद ठेउन आपला विरोध नोंदविला आहे. व्यापाऱ्यांनी विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी केली आहे. आजचा आमचा एक दिवस लक्षणिक बंद आहे, आसे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
या बंद मध्ये प्रसाद विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकही सहभागी असल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे प्रचंड हाल झाले. लहान मुले आणि वृद्ध यांचेसुद्धा हाल झाले. यातून प्रशासन आमची मागणी मान्य करतील अशी आशा व्यापारी वर्गात आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर